Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

जागतिक महिला दिन ... ८ मार्च २०२५...

 #अक्षर

#akshar

जागतिक महिला दिन ... ८ मार्च २०२५...
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा व सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला..
व्याख्याती : तृप्ती अनिल  कांबळे ( प्रशालेची माजी विद्यार्थिनी)
विषय: आजच्या महिलांसमोरील आव्हाने
       तसेच या दिनाच्या औचित्याने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले... दोन्ही कार्यक्रम आयोजन करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार 💐💐



 

राष्ट्रीय विज्ञान दिन..

 National science day celebration... Those who have photos of today's programme send in group... 



राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेता गट

*कोमसाप शाखा व पं. स . समिती शिक्षण विभाग लांजा आयोजित कथा लेखन स्पर्धा उत्साहात*

 *कोमसाप शाखा व पं. स . समिती शिक्षण विभाग लांजा आयोजित कथा लेखन स्पर्धा उत्साहात*
लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मराठी कथालेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे -
*प्राथमिक गट:* प्रथम श्लोक प्रवीण गुरव,  जि. प. प्राथ. शाळा वनगुळे नं. १ , द्वितीय अदिती अमोल जाधव ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, तृतीय स्वस्ती रमेश मांडवकर सेंट ॲने विद्यानिकेतन, उत्तेजनार्थ निधी संजय ठिक,जि. प. प्राथ. शाळा जावडे नं. १, उत्तेजनार्थ तनिष्का विकास गुरव जि. प. प्राथ. शाळा वनगुळे नं. १
 *माध्यमिक गट:* प्रथम अभय विजय कुष्टे न्यू इंग्लिश स्कूल लांजा, द्वितीय शमिका गिरीश आठले न्या . वै. वि. आठले विद्यामंदिर शिपोशी, तृतीय समृद्धी दिगंबर साळसकर श्रीराम विद्यालय वेरवली, उत्तेजनार्थ जान्हवी संदीप नारकर रा. सी. बेर्डे विद्यालय सापुचेतळे, उत्तेजनार्थ समीक्षा अरविंद नामये श्रीराम विद्यालय वेरवली
 *महाविद्यालयीन गट:* प्रथम श्रुती प्रकाश गोसावी न्यू इंग्लिश स्कूल लांजा , द्वितीय साहिल सदानंद कालकर रा. सी. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे, तृतीय रेश्मा प्रकाश नामये विद्यादीप ज्युनिअर कॉलेज लांजा, उत्तेजनार्थ पूजा लहू पवार  रा. सी. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे,, उत्तेजनार्थ सानिका सुनिल कांबळे विद्यादीप ज्युनिअर कॉलेज लांजा यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रदीप कदम,  दिलीप चव्हाण, सविता माळी, उमेश यादव,  रवींद्र जायगडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, सहकार्यवाह भीमराव खोत, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे, महिला विभाग प्रमुख सविता पाटील, जनसंपर्क प्रमुख दत्तात्रय देसाई, प्रसिद्धी प्रमुख संदेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य रिया लिंगायत, मनीषा पाटील, सुधाकर कांबळे, प्रभाकर गवाणकर, नारायण कदम, काशिराम जाधव, सुलभा पोकळेकर, नसीमा मुलाणी, रामचंद्र लांजेकर, पं.स. शिक्षण विभाग विषय तज्ञ श्री. हर्षे आदींनी मेहनत घेतली.

रंग इंद्रधनूचे सांस्कृतिक कार्यक्रम

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷 *सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...*    *जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा येथे सोम. दि. 3 फेब्रु. 2025 रोजी सायंकाळी 7.00 वा. प्रशालेत विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम *रंग इंद्रधनुचे** *आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, कलाकारांना प्रोत्साहित करावे. ही विनंती.*   - मुख्याध्यापक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्य



 कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेचे कार्यवाह आदरणीय श्री प्रकाश हरचेकर सर यांची जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली आहे. याचा कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेला अभिमान वाटतो आणि म्हणूनच सरांचं कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला.
सर, आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा !!!💐💐💐


 

कोकण विभाग शिक्षक आमदार सन्मा श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विकास निधीतून आज दि. 21/01/2025 रोजी e learning साहित्य वाटप

 आपल्या प्रशालेला कोकण विभाग शिक्षक आमदार सन्मा श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विकास निधीतून आज दि.  21/01/2025 रोजी e learning साहित्य मध्ये प्रोजेक्टर, 5 वी ते 10 वी अभ्यासक्रम पेन ड्राईव्ह, स्क्रीन, स्टँड, ब्लूटूथ स्पीकर , mouse आदी साहित्य मान्यवरांच्या हस्ते लांजा येथे वितरित...


 

शोध कला रत्नांचा

शोध कला रत्नांचा...

 20/01/2025



जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शुक्र. दि. 17 /01/2025 रोजी करियर मार्गदर्शन

 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक  संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शुक्र. दि. 17 /01/2025 रोजी करियर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आपल्या प्रशालेचे माजी विज्ञान विभाग प्रमुख श्री. प्रभकर सनगरे यांनी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत संविधनाबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर व्याख्याते संदीप पाटील यांनी  करियर मार्गदर्शन मध्ये 10 वी 12 नंतरपुढे काय? या बद्दल विस्तृत माहिती दिली. यावेळी या संस्थेचे योगेश पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना 600 वह्यांचे संस्थेमार्फत कऱण्यात आले. कार्यक्रमाला प्रशालेचे माजी मुख्याध्यापक पाटील सर , स्थानिक संस्थेचे सदस्य महमद पावसकर व  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.🙏🙏




 

शासकीय रेखाकला इंटरमिजीएट परीक्षा सुयश...

*अभिनंदनीय...💐💐💐*
*शासकीय रेखाकला इंटरमिजीएट परीक्षा सुयश...*
 *प्रशालेचा निकाल - 100%*
*सर्व यशस्वी विद्यार्थी - विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन...!!!*
 
 *A ग्रेड*
विनय विजय कोलापटे
लतिका भूषण सावंत
 *B ग्रेड*
गौरी प्रमोद शिंदे
नियाज नजीर मालदार
फैजान महमद पावसकर
 *C ग्रेड*
मानव विकास कांबळे
केयुर पांडूरंग साळुंके
कुलदीप दीपक पाटोळे
साहिल सुनील तिखे
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!💐💐*
मुख्याध्यापक/-
ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी

लांजा तालुका विज्ञान प्रदर्शन २०२५ मध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुकास्तरीय *प्रथम क्रमांकाचे** *पारितोषिक

 06/01/2025 *अभिनंदन....💐💐💐*
 *लांजा तालुका विज्ञान प्रदर्शन २०२५ मध्ये  जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुकास्तरीय  *प्रथम क्रमांकाचे** *पारितोषिक पटकावले. विद्यालयाच्यावतीने लतिका भूषण सावंत (9वी) व कस्तुरी संदीप मेस्त्री (9वी) या विद्यार्थिनींनी विज्ञान व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देत हे यश मिळवले. यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. स्वरा वासुरकर मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐* 



मुख्याध्यापक/-
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी



*अभिनंदन....🪷🌺🌷🌹*
*पेडणेकर विद्यालयाला दुहेरी मुकुट*
 *लांजा तालुका विज्ञान प्रदर्शन २०२५ मध्ये  जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेने विज्ञान प्रतिकृती स्मार्ट अॅम्बुलन्स याला श्रीराम अनंत लांजेकर (इ. ८ वी) व गायत्री मिलींद  दरडे (इ. ८ वी) उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत  कु. लतिका भूषण सावंत (9वी) व कु. कस्तुरी संदीप मेस्त्री (9वी)  प्रथम क्रमांक या विद्यार्थिनींनी विज्ञान व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देत हे यश मिळवले. यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. स्वरा वासुरकर मॅडम यांचे  संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंददादा जगन्नाथ पेडणेकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.*
🪷🌹🌷🌺
श्री. हर्चेकर पी. पी.
मुख्याध्यापक/-
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸



🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

सोनवी शिक्षण प्रसारक मंडळ सोनवडे ता. संगमेश्वर ने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय १४ वर्षे वयोगट खो- खो स्पर्धेत

 


*रत्नागिरी जिल्हा खोखो असोसिएशनच्या मान्यतेने सोनवी शिक्षण प्रसारक मंडळ सोनवडे ता. संगमेश्वर ने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय १४ वर्षे वयोगट खो- खो स्पर्धेत तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई संचलित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचा संघ उपविजेता ठरला. चिपळूण,ओणी राजापूर संघाना एक डाव राखून पराभूत करत अंतिम सामन्यात संगमेश्वर बरोबर उपविजेता ठरला.प्रशालेला रोख र.३३३३/-व सन्मानचिन्ह. उत्कृष्ट संरक्षण प्रसाद पाष्टे तर उगवता तारा प्रयाग नामये यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशालेच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर व सर्व पदाधिकारी मुंबई,स्थानिक,शाळा समिती,पालक,ग्रामस्थ,मुख्याध्यापक,शिक्ष,शिक्षकेतर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.*

मतदार जनजागृती

मतदार जनजागृती संविधान दिन..




 

वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी कोमसापच्या लांजा शाखेची निवड

 वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी कोमसापच्या लांजा शाखेची निवड
      कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रदान केले जातात. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा - लांजाने सातत्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी लांजा शाखेची निवड करण्यात आली आहे.
         कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई,नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अनेक शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी कोमसाप रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शाखा कार्यरत आहे. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी काही विशिष्ट उपक्रम शाखा राबवत असते. आजवर वाचन चळवळ वृध्दींगत होण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी जागतिक कीर्तीचे पंच्याहत्तर महामानव या संस्कारक्षम पुस्तकाचं वितरण, खुल्या गटासाठी तालुकास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, काव्यमाला अंतर्गत केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त काव्यवाचन, गुरुपौर्णिमा, सभासद नोंदणी, जुन्या नव्या पुस्तकांचे संकलन करून तळवडे येथील शेतकरी मंचाला पुस्तक भेट, विशेषदिनानिमित्त विविध विषयांवरील व्याख्याने, आदी उपक्रम घेण्यात आले. हे उपक्रम तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा , महाविद्यालय तसेच लोकमान्य वाचनालय लांजे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा समृद्धीसाठी राबविण्यात आले आहेत. मराठी भाषा आणि साहित्य चळवळ सुरू ठेवण्यासाठी लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, सहकार्यवाह भीमराव खोत, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे,  महिला विभाग प्रमुख सविता पाटील, जनसंपर्क प्रमुख दत्तात्रय देसाई, प्रसिद्धी प्रमुख संदेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य रिया लिंगायत, मनीषा पाटील, सुधाकर कांबळे, प्रभाकर गवाणकर, नारायण कदम, काशिराम जाधव, सुलभा पोकळेकर, नसीमा मुलाणी, रामचंद्र लांजेकर, सल्लागार आदम मापारी, वसंत देसाई,गजानन जगताप,आदीं मेहनत घेत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाला वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाखेचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

कवीवर्य केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाच्यावतीने विनम्र अभिवादन

*📚📚📚📚📚📚📚📚📚कवीवर्य केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाच्यावतीने विनम्र अभिवादन!!*
          *या विशेष दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे ऑनलाईन पद्धतीने वाचन करण्यात आले. यातील सर्व सहभागी वाचकांचे मनःपूर्वक आभार!!*
कविता वाचन -
1. सौ. मनिषा पाटिल, सहाय्यक शिक्षिका, कै. रा. सी. बेर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सपुचेतळे
https://youtu.be/Gv2aCis9JTs?feature=shared

2. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविता वाचन - साई कालकर, कै. रा. सी. बेर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सापुचेतळे  | कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन

https://youtu.be/FkblKHt-Ua4?feature=shared
3. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन - सौ. रिया रुपेश लिंगायत, सहाय्यक शिक्षिका सेंट ॲने विद्यानिकेतन देवधे
https://youtu.be/aF8KmVJpWi8?feature=shared

4. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविता वाचन - डॉ. माया तिरमारे, लांजा | कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन
https://youtu.be/9iln9prPMQ4?si=36Mj1Ea5QTgZHQpi

5. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन - सौ . संयोगिता पाटील, सेंट ॲने विद्यानिकेतन, देवधे|
https://youtu.be/99yjTPqAzrM?si=y2T2SYS1TjJr4foO

6. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन-स्मिता कदम, सहाय्यक शिक्षिका, सेंट ॲने विद्यानिकेतन, देवधे|
https://youtu.be/j34WdxAcnD0?si=fPIhWe8RMDqC4M2o

7. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन-सौ. सविता पाटील, सहाय्यक शिक्षिका,..
https://youtu.be/OylUNN0-VI8?si=4MRbdh7HJfKkxrV6

8. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन-कु. सुचित दिलीप तावडे, जि. प. शाळा वनगुळे नंबर
https://youtube.com/shorts/7lGG-yX5XcA?si=eFHM8kTSD7zHstZ7

9. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन-कु.
गौरव नितीन घाडी, जि.प. शाळा वनगुळे नंबर १
https://youtu.be/L9-TJjn2q4A?si=TlVgJXoXTws4OzSp

10. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन-कु.
विराज राजेंद्र शिंदे, जि.प. शाळा वनगुळे नंबर १
https://youtu.be/KPHYT4VMFSY?si=cUn6Xrse2_I_ea1U


11. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचनआर्या संदीप माजजळकर, न्यू इंग्लिश स्कूल जावडे
https://youtu.be/E-pv-RAeaSo?si=ZK1m62aWJ86QKTDd

12. कोमसाप शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन- कु. रिया सावळाराम सावंत, माध्यमिक आश्रम शाळा जावडे|
https://youtu.be/5sZV8Q2dkas?si=2RaLioUL_jSriEO6

13. कोमसाप शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन- कु. अक्षता दत्ताराम जांगळे, माध्यमिक आश्रम शाळा जावडे|
https://youtu.be/5F1blAP415Y?si=kg8YPAVz9x4EHZsF

14. कोमसाप शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन- कु. हर्षाली मंगेश कदम, ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे|
https://youtu.be/Tvs77Nz_RPw?si=_Y1xfpE28hspBdGT

15. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा|कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन-कु. गौरव नितीन घाडी, जि.प. शाळा वनगुळे नंबर १
https://youtube.com/shorts/5deU5mSlIKg?si=eLreHQPw8UhXmq2B

16. कोमसाप/कविवर्य केशवसुतांच्या कवितांचे वाचन|  कु. सुचित दिलीप तावडे, जि. प. शाळा वनगुळे नंबर
https://youtu.be/R3P-Ubyeso0?si=wF5fqJshNa7Zi9um

शालेय खो खो स्पर्धेत पेडणेकर विद्यालय मुली विजयी मुलगे उपविजयी*

05/10/204  *शालेय खो खो स्पर्धेत पेडणेकर विद्यालय मुली विजयी मुलगे उपविजयी*





लांजा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या लांजा तालुका स्तरीय  १७ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मुलींचा संघ विजयी. तर मुलांचा  संघ उप विजयी झाला.मुलींचा अंतिम सामना जावडे हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे तर मुलांचा अंतिम सामना लांजा हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे यांच्यात झाला. मुलींच्या अंतिम सामन्यात आरती पाष्टे,कस्तुरी मेस्त्री,दिक्षा मांडवकर,मृगजा कामेरकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.
  मुलगे- मनिष  इंगळे,(कर्णधार) आयुष इंगळे, साईराज दरडे, विनय कोलापटे,दिपराज इंगळे,ओंमकार दरडे,भावेश गुरव, तनिश पितळे, दिव्येश पड्ये, सार्थक गुरव,नीरज करंबेळे,प्रसन्न करंबेळे, आकाश मांडवकर,योगेश गुरव, सार्थक इंगळे.
मुली - दिक्षा मांडवकर (कर्णधार) आरती पाष्टे, कस्तुरी मेस्त्री, मृगजा कामेरकर,शर्वरी तिखे, लतिका सावंत, उज्वला पालकर, सायली घवाळी, स्नेहांजली चव्हाण, कस्ती गुरव, मैत्री पांचाळ, तन्वी दरडे, आर्या पाटोळे. सिध्दी इंगळे.
प्रशिक्षक - सुशील वासुरकर, विजय पाटोळे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे,  यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी. बी. पाटील,शिक्षक प्रकाश हर्चेकर,नेहा पाटोळे, स्वरा वासुरकर, सुवारे मॅडम,सावंत मॅडम शिक्षकेतर कर्मचारी शुभम पाटोळे,अविनाश चव्हाण,जनार्दन पाटोळे यांचे सहकार्य मिळाले. प्रशालेच्या या यशाबद्दल  तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर, व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी,शाळा समिती यांनी अभिनंदन करुन  विजयी संघास जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 08/10/204

*अभिनंदन...!* 🌷🌹
*आज झालेल्या शालेय १४ वर्षे मैदानी स्पर्धेत आपल्या प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.*

१०० मीटर धावणे मुली
आश्लेषा शशिकांत पड्ये.इ.६वी तृतीय
४०० मीटर धावणे
जान्हवी प्रकाश गुरव इ. ८ वी द्वितीय.

४×१०० रिले मुली द्वितीय
जान्हवी प्रकाश गुरव
तन्वी दिपक इंगळे
उज्वला महेश दरडे
आश्लेषा शशिकांत पड्ये
आराध्या गुरुदास माने. 

09/10/204

*अभिनंदन...!* 🌷🌹
*आज झालेल्या शालेय १७ वर्षे मैदानी स्पर्धेत आपल्या प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.*

२०० मीटर धावणे मुलगे
विनय विजय कोलापटे .इ.१०वी तृतीय
८०० मीटर धावणे मुली
मृगजा महेंद्र कामेरकर इ.१० वी तृतीय.

४×१०० रिले मुली तृतीय
आरती अनिल पाष्टे
कस्तुरी संदिप मेस्त्री
दिक्षा दत्ताराम मांडवकर
मृगजा महेंद्र कामेरकर
शर्वरी मंगेश तिखे

 

Hindi Vibhag... हिंदी विभाग सुयश

 04/10/204🌹🌹हिंदी पखवाडे के अंतर्गत प्रतियोगि ताओं में अपने स्कुल का यश🌹🌹
🔸निबंध प्रतियोगिता🔸
कु. गौरी प्रमोद शिंदे - द्वितीय
🔸 स्वरचित कहानी 🔸
कु .सिद्धी विजय दरडे -प्रथम

 *शालेय खो खो स्पर्धेत पेडणेकर हायस्कूलला दुहेरी मुकुट.*





लांजा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या लांजा तालुका स्तरीय १४ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मुलगे मुली दोन्ही संघ विजयी झाले. मुलांचा अंतिम सामना लांजा हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे तर मुलींचा अंतिम सामना आश्रमशाळा जावडे विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे यांच्यात झाला. गतवर्षीची विजयी परंपरा राखण्यात दोन्ही संघ यशस्वी ठरले. मुलांच्या अंतिम सामन्यात प्रसाद पाष्टे, चेतन इंगळे, श्रेयस तिखे, प्रयाग नामये, तनीश तिखे,समर्थ साळवी यांनी उत्कृष्ट खेळ केला.
  मुलगे- चेतन इंगळे,(कर्णधार) प्रसाद पाष्टे, श्रेयस तिखे,तनीश तिखे, प्रयाग नामये,समर्थ साळवी, सौरभ कामेरकर, रोहित इंगळे, शुभम इंगळे, चिराग पाटोळे, सोहम इंगळे, सोहम गुरव, आदित्य नामये,गुरुप्रसाद इंगळे, पार्थ आगरे.
मुली - जान्हवी गुरव (कर्णधार) उज्वला दरडे, सृष्टी शिंदे, तन्वी इंगळे, गायत्री दरडे, पौर्णिमा दरडे, आश्लेषा पड्ये,अनुष्का खामकर, तन्वी मांडवकर, सान्वी दरडे, प्राची मेस्त्री, आराध्या माने, शितल गुरव, सार्थकी पांचाळ,गार्गी राऊळ.
प्रशिक्षक - सुशील वासुरकर, विजय पाटोळे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे,  यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी. बी. पाटील,शिक्षक प्रकाश हर्चेकर,नेहा पाटोळे, स्वरा वासुरकर, सुवारे मॅडम,सावंत मॅडम शिक्षकेतर कर्मचारी शुभम पाटोळे,अविनाश चव्हाण,जनार्दन पाटोळे यांचे सहकार्य मिळाले. प्रशालेच्या या यशाबद्दल  तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर, व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी,शाळा समिती यांनी अभिनंदन करुन जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनंदनीय...

Video making spardha...


 

उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या गरजू, होतकरू व गुणवंत मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली

 13/09/2024

 ग्रीन प्लस फाउंडेशन वसई या संस्थेच्या वतीने दरवर्षी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे या प्रशालेतून उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या गरजू, होतकरू व गुणवंत मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.संस्थेचे विश्वस्त सचिव डॉ. विकास भार्गव पाटोळे यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेने व सहकार्याने हा उपक्रम सुरु आहे.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून उच्च शिक्षण घेणा-या  गरजू मुलींसाठी हा उपक्रम सुरु आहे. आपल्या गावच्या शाळे विषयी व विद्यार्थ्याविषयी प्रेम आणि आस्था असणारे डॉ. विकासजी पाटोळे यांचे भाऊ अनिल भार्गव पाटोळे यांनी  तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई या संस्थेने उभारलेल्या हायस्कूलच्या उभारणीत बंधूचे योगदान लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु केला आहे असे सांगतात. ग्रीन प्लस फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते मुंबई व इतर ठिकाणी घेत असतात. तळवडे पंचक्रोशीतील गरजूंना सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हाॅस्पीटल उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल मनस्वी धन्यवाद. 

सदर शिष्यवृत्ती वितरण समारंभास सन्मा.सरपंच रोहिणीताई आंबेकर,सन्मा.
उपसरपंच प्रसाद ढेपे,
बाप्पाभाई पाटोळे
विजय श्रीधर पाटोळे
सुधाकर मुकुंद पाटोळे
चंद्रकांत आंबेकर
 सौ.नेहा नंदकुमार पाटोळे मॅडम, श्री. गणेश झोरे सर, शुभम पाटोळे, जनार्दन पाटोळे, अविनाश चव्हाण
विद्यार्थी , पालक उपस्थित होते.डॉ.विकासजी पाटोळे यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी कौतुक केले आहे.

 शिष्यवृत्ती म्हणजे पुढील शिक्षणासाठी प्रेरणा.
शिष्यवृत्ती म्हणजे शिक्षणाला चालना.
शिष्यवृत्ती म्हणजे पुढील शिक्षणासाठी उत्तेजन.
शिष्यवृत्ती म्हणजे पुढील शिक्षणाला प्रोत्साहन.
शिक्षण ही एक शक्ती आहे.
आणि मग या शक्तीच्या जोरावरच ,
प्रगतीची अनेक क्षितिजे पादाक्रांत करता येतात.
त्यासाठी ध्येय, ध्यास आणि धडपड यांची नितांत गरज आहे.
लाभार्थी शिष्यवृत्ती धारक मुलींनी संस्था, शाळा यांच्या प्रति कायम कृतज्ञतेची भावना मनात राखावी.
सदर शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आदरणीय डॉ. विकास भार्गव पाटोळे यांची गाव, संस्था,शाळा यांच्या प्रति तळमळ आहे.
ग्रीन प्लस फाउंडेशन, वसई या संस्थेच्या प्रति कृतज्ञता.- माजी मुख्याध्यापक श्री. रामचंद्र जाधव
💐💐🙏🙏💥💥👏👌

 

रक्षाबंधन 12/08/2024

 रक्षाबंधन  12/08/2024 सैनिकांना राख्या पाठविणे उपक्रम...


 


 

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा..15/08/2024

 देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा..15/08/2024








 

विज्ञान नाटिका स्पर्धा 12/08/205

 आज 12/08/2024 तालुका स्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धा संपन्न झाली. आपल्या *जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे* या प्रशालेच्या *"असाच दिसत होता तो"* या नाटिकेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. लेखन गणेश झोरे सर तर दिग्दर्शन गणेश झोरे सर व स्वरा वासुरकर मॅडम यांनी केले. मार्गदर्शक व विद्यार्थी यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर व पदाधिकारी मुंबई व स्थानिक, शाळा समिती, मुख्याध्यापक व शिक्षक सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

 



शालेय स्वराज्य मंत्रीमंडळ निवडणूक लोकशाही EVM पध्दतीने

 *आज 10/08/204 

आपल्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेत शालेय स्वराज्य मंत्रीमंडळ निवडणूक लोकशाही EVM पध्दतीने अॅपद्वारे घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मतदानाचा अनुभव घेता यावा यासाठी शालेय स्तरावर उपक्रम घेण्यात आला. 🌷🌷👍👌