13/09/2024
ग्रीन प्लस फाउंडेशन वसई या संस्थेच्या वतीने दरवर्षी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे या प्रशालेतून उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या गरजू, होतकरू व गुणवंत मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.संस्थेचे विश्वस्त सचिव डॉ. विकास भार्गव पाटोळे यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेने व सहकार्याने हा उपक्रम सुरु आहे.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून उच्च शिक्षण घेणा-या गरजू मुलींसाठी हा उपक्रम सुरु आहे. आपल्या गावच्या शाळे विषयी व विद्यार्थ्याविषयी प्रेम आणि आस्था असणारे डॉ. विकासजी पाटोळे यांचे भाऊ अनिल भार्गव पाटोळे यांनी तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई या संस्थेने उभारलेल्या हायस्कूलच्या उभारणीत बंधूचे योगदान लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु केला आहे असे सांगतात. ग्रीन प्लस फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते मुंबई व इतर ठिकाणी घेत असतात. तळवडे पंचक्रोशीतील गरजूंना सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हाॅस्पीटल उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल मनस्वी धन्यवाद.
सदर शिष्यवृत्ती वितरण समारंभास सन्मा.सरपंच रोहिणीताई आंबेकर,सन्मा.
उपसरपंच प्रसाद ढेपे,
बाप्पाभाई पाटोळे
विजय श्रीधर पाटोळे
सुधाकर मुकुंद पाटोळे
चंद्रकांत आंबेकर
सौ.नेहा नंदकुमार पाटोळे मॅडम, श्री. गणेश झोरे सर, शुभम पाटोळे, जनार्दन पाटोळे, अविनाश चव्हाण
विद्यार्थी , पालक उपस्थित होते.डॉ.विकासजी पाटोळे यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी कौतुक केले आहे.
शिष्यवृत्ती म्हणजे पुढील शिक्षणासाठी प्रेरणा.
शिष्यवृत्ती म्हणजे शिक्षणाला चालना.
शिष्यवृत्ती म्हणजे पुढील शिक्षणासाठी उत्तेजन.
शिष्यवृत्ती म्हणजे पुढील शिक्षणाला प्रोत्साहन.
शिक्षण ही एक शक्ती आहे.
आणि मग या शक्तीच्या जोरावरच ,
प्रगतीची अनेक क्षितिजे पादाक्रांत करता येतात.
त्यासाठी ध्येय, ध्यास आणि धडपड यांची नितांत गरज आहे.
लाभार्थी शिष्यवृत्ती धारक मुलींनी संस्था, शाळा यांच्या प्रति कायम कृतज्ञतेची भावना मनात राखावी.
सदर शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आदरणीय डॉ. विकास भार्गव पाटोळे यांची गाव, संस्था,शाळा यांच्या प्रति तळमळ आहे.
ग्रीन प्लस फाउंडेशन, वसई या संस्थेच्या प्रति कृतज्ञता.- माजी मुख्याध्यापक श्री. रामचंद्र जाधव
💐💐🙏🙏💥💥👏👌
No comments:
Post a Comment