Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

Showing posts with label My School Activities. Show all posts
Showing posts with label My School Activities. Show all posts

YOGA DAY...

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयामध्ये नेहरू युवा केंद्र रत्नागिरी, गांगेश्वर कला व क्रीडा वृंद तळवडे व प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तायकाँदो असोसिएशनचे सचिव राम कर्रा, तेजस पावस्कर उपस्थित होते. राम कर्रा यांनी योग दिनाच्या औचित्याने योग प्रात्यक्षिके दाखवली. योग प्रात्यक्षिके नियमित केल्याने होणारे फायदे सांगितले. प्रशालेतील विद्यार्थी राजलक्ष्मी पाटील, आशीष मांडवकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर स नगरे यांनी केले व आभार प्रकाश हर्चेकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक भीमराव खोत, गांगेश्वर कला व क्रीडा वृंद तळवडेचे कार्यवाह विजय पाटोळे, बाळासाहेब आवटे, दादासाहेब पाटील, मनिषा विश्वासराव, आश्विनी कुरूप, स्वरा वासुरकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.