Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

नवागतांचे स्वागत

लांजा तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे नवागतांचे लेझीम नृत्यासह ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईच्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, सदस्य चंद्रकांत आंबेकर, नीलम पाटोळे, शाळा समिती सदस्य विजय पाटोळे, तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई संस्थेचे सदस्य वैभव पाटोळे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर , तळवडेच्या सरपंच रोहिणी आंबेकर, उपसरपंच प्रसाद ढेपे, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटोळे, पालक मंगेश सुतार, भाई मांडवकर, सुरेश धावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 


 

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवीन प्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनींचे औक्षण करण्यात आले. वेलकम बँड बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधापक प्रकाश हर्चेकर यांनी केले. त्यानंतर  ५ वी ते ८ वी च्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरामधून दिगंबर पाटोळे, विजय पाटोळे, प्रसाद ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश झोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, अक्षता सावंत, प्रेरणा बेंद्रे, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे, विनय कोलापटे यांनी मेहनत घेतली. 

तळवडे : जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे नवागतांचे स्वागत कार्यक्रमातील क्षण. 

No comments: