*तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई संचलित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे या प्रशालेची विद्यार्थींनी कु. तनिषा दिलीप पालकर ही पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ च्या परीक्षेत २२४ गुण प्राप्त करून जिल्हा गुणवत्ता यादीत आली आहे.
कु. तनिषाला मार्गदर्शक करणारे माजी मुख्याध्यापक पाटील सर, मुख्याध्यापक हर्चेकर सर, पाटोळे मॅडम, झोरे सर, सावंत मॅडम, वासुरकर मॅडम, कोत्रे मॅडम या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. कु. तनिषा व सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर व सर्व मुंबई कमिटी,स्थानिक कमिटी,शाळा समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.*
No comments:
Post a Comment