पेडणेकर विद्यालयात शालेय स्वराज्य सभा निवडणूक उत्साहात
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर : EVM सिम्युलेटर तंत्रज्ञानाचा केला वापर
तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई संचलित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे , ता. लांजा येथे शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ निवडणूक २०२५-२६ पार पडली. विद्यार्थ्यांनी सिम्युलेटर अँप च्या माध्यमातून EVM द्वारे निवडणूक प्रक्रियेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
ही निवडणूक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदांसाठी घेण्यात आली. या निवडणुकीद्वारे स्वराज्य मंडळाच्या मुख्यमंत्रीपदी दीपराज इंगळे तर उपमुख्यमंत्री पदी अनुष्का खामकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत केंद्राध्यक्ष तनिष पितळे, मतदान अधिकारी 1 स्वयम कुंभार, मतदान अधिकारी 2 अकमल मालदार, मतदान अधिकारी 3 यश चव्हाण यांनी काम पाहिले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शिक्षिका स्वरा वासुरकर, शिक्षक विवेक किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, अक्षता सावंत, प्रेरणा बेंद्रे, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांनी मेहनत घेतली.