चाईल्ड हेल्प लाईन 1098 रत्नागिरीच्यावतीने विद्यार्थी सुरक्षितता मार्गदर्शन

 



लांजा तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेत 19/09/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन 1098 रत्नागिरीच्यावतीने विद्यार्थी सुरक्षितता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, सुपरवायझर आदित्य चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, प्रेरणा बेंद्रे, अक्षता सावंत, आदी उपस्थित होते. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर यांनी केले. कार्यक्रमात अन्वी शिंदे यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनिशी संवाद साधला. विद्यार्थी सुरक्षितता, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, बालकांचे हक्क, स्व संरक्षण याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बोलते केले व मार्गदर्शन केले. यावेळी सायबर सुरक्षितता बाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा वासुरकर यांनी मानले तर आभार श्वेता सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा पाटोळे, गणेश झोरे, विवेक किल्लेदार, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments