शिक्षक दिन
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यानी पुष्पगुच्छ व भेटकार्ड देवून सन्मान केला. प्रशालेचे मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. वैभवी चव्हाण हिने शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी शालेय कामकाजाचा अनुभव घेतला. त्यामधे मुख्याध्यापिका म्हणून भक्ती दरडे, लिपिक - शौर्य शेटे, शिपाई - सार्थक गुरव यांनी काम पाहिले. शिक्षक बनून भक्ती दरडे, स्वरांगी पांचाळ, मीनल टोळे, वैभवी चव्हाण, श्रेया कांबळे, प्राजक्ता शिंदे, गौरी शिंदे, विनय कोलापटे, अंश कांबळे, श्रेयस चव्हाण, विक्रम चव्हाण, निखिल शिंदे, श्रीराम लांजेकर, पार्थ आगरे दीक्षा मांडवकर, कस्ती गुरव, गार्गी राऊळ, अनुष्का खामकर, अलका भितळे, शर्वरी तिखे, उज्ज्वला पालकर, साजिया मालदार, आराध्या माने आदींनी अध्यापनाचा अनुभव घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी शेवटी आपापले अनुभव व्यक्त केले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरांगी पांचाळ हिने केले तर आभार तन्वी गुरव हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक डी. बी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश हर्चेकर, प्रभाकर सनगरे, नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासूरकर, स्नेहा कोत्रे, सौ. कांबळे, शुभम पाटोळे, विजय चव्हाण, अविनाश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.