पेडणेकर विद्यालयात नवागतांचे स्वागत
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी लांजा तालुक्यातील तळवडे येथील ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालयात नवागतांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
 |
ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे औक्षण करून व ग्रंथ दिंडी काढून स्वागत करण्यात आले. |
स्वागताच्या कार्यक्रमासाठी तळवडे शिक्षणोत्तेजक संस्थेच्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, सदस्य महंमद पावसकर, मुंबई संस्थेचे सदस्य वैभव पाटोळे, माजी मुख्याध्यापक भीमराव खोत, मुख्याध्यापक दादासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते नववीमध्ये नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिगंबर पाटोळे, संजय पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रभाकर सनगरे, प्रकाश हर्चेकर, गणेश झोरे, विजय पाटोळे, गजानन पाटोळे, प्रभाकर दरडे, नेहा पाटोळे, स्वरा वासुरकर, स्नेहा कोत्रे, आकांक्षा कदम, वैशाली माने, गौरी माने, शुभम पाटोळे, विजय चव्हाण, अविनाश चव्हाण आजी माजी विद्यार्थी तसेच पालकवर्ग उपस्थित होता.