' आनंदासाठी शिका, माणूस घडविण्यासाठी शाळा महत्त्वाच्या आहेत व व्यक्तीमध्ये विवेक घडविण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही." असे मत व्याख्याते जयंत फडके यांनी तळवडे येथे व्यक्त केले. सांगा कशाला शिकायचं? या विषयावर ते लांजा तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे आयोजित शारदीय व्याख्यान

व्याख्यानाच्या पहिल्या सत्राला व्याख्याते जयंत फडके, कुमार गावडे, माजी विज्ञान शिक्षक प्रभाकर सनगरे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर आदी मान्यवर तर दुसऱ्या सत्राला तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम, व्याख्यात्या रोशनी जाधव, शाळा समिती सदस्य विजय पाटोळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अक्षता सावंत, श्वेता सावंत यांनी केले, व्याख्यात्यांची ओळख गणेश झोरे व नेहा पाटोळे यांनी केली. आभार प्रेरणा बेंद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, अक्षता सावंत, प्रेरणा बेंद्रे, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांनी मेहनत घेतली.
0 Comments